महाबळेश्वरचे रोमांच.

  • 9.4k
  • 4.4k

तो छान दिवस उजाडलाच मुळी काहीसा वेगळ्या पध्दतीने. एकच रात्र झाली होती महाबळे्वरला येऊन. पण कालचा दिवस धुमदार पाऊसाचा होता. काल पुणेहुन आमच्या ऑफिसच्या इथल्या गेस्टहाऊसपर्यंत पोचलो तेच धुमदार पावसात, इतक्या पाऊस की गाडीतुन सामान काढुन आत बंगल्यात आत जाइपर्यंत पार ओला चिंब झालो. हा गेस्टहाऊसचा बंगला बराचसा आडवाटेला आहे. त्यामुळेच मला येथे यायला भारी आवडते. वर्षातुन दोनदा तरी मी येतोच. या बाजुला घनदाट झाडी आहे. मातीच्या पाऊलवाटा, त्यामुळे मला इकडे भरपुर चालायला आवडते.आज सकाळपासुन छान उन पडले होते. लवकर उठुन मी जवळच्या एका पॉईंटला चालत जायचे ठरवले. आठवड्याचा मधला दिवस, आणी पावसाळा, त्यामुळे महाबळेश्वर ओस पडले होते. त्यामुळे निर्मनुष्य