साक्षीदार - 1

  • 18.2k
  • 11.2k

साक्षीदार माझी नवीन रहस्य कथा क्रमशः प्रसिद्ध करत आहे. यातील सर्व पात्रे ,प्रसंग,घटना काल्पनिक असून वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील कोणत्याही कथेशी याचा संबंध नाही. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.सदर कथा किंवा त्याचा कोणताही भाग कोणीही माझ्या पूर्व परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये. साक्षीदार प्रकरण १ “ तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात? ” पाणिनी समोर बसलेल्या त्या तिशीतल्या तरुणीने पाणिनीला च प्रश्न केला. “ तुम्ही ईशा गरवारे आहात हे खरं असेल तर मी पाणिनी पटवर्धन आहे हे खरं आहे.” पाणिनी म्हणाला तिचे डोळे पाणिनी कडून हो या उत्तराची अपेक्षा करत होते ,ते एकदम स्तब्ध झाले आणि पाणिनी चे उत्तरं ऐकून तिला एकदम