सद्गुणाचे नाटक

  • 23.7k
  • 7.4k

मराठी नितीकथा ५----------------------- "सद्गुणाचे नाटक" मच्छिंद्र माळी, पडेगांव,औरंगाबाद. एका गावात शांताबाई आणि कांताबाई अशा दोघी शेजारी शेजारी रहात होत्या. शांताबाई नावाप्रमाणे सुशिल, शांत वृत्तीची पतिसेवा परायण होती याउलट कांताबाई नव--याशी सतत भांडून आकांत करणारी.शेजारणीचे सत्वशील वर्तन पाहून तीही तिच्या वागण्याची नक्कल करुन आपणही काही कमी नाही असं नाटक करायची. त्याकरिता ती सतत शांताबाईवर पाळत ठेवून असायची. एके दिवशी दुपारी शांताबाई मुसळाने भात कांडत होती.तितक्यात तिचा पती बाहेरगावाहून आला व त्याने बाहेरुनच पाणी मागितले. त्यावेळी तिच्या हातातले मुसळ वर गेलेले होते. पतिसेवेत तत्पर शांताबाईने पतिसेवा करणेसाठी मुसळ तसेच वर अधांतरी सोडून ती ताबडतोब उठली पण पातिव्रत्त्याचा प्रभाव म्हणुन मुसळ तसेच वर