चौपाडी - एक भूक! - ०४

  • 7.7k
  • 3.9k

आतापर्यंत आपण बघीतले,चौपाडीवर सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक यातना, बत्सलच्या खूनाचा बदला आणि दित्याविषयी असलेली काळजी म्हणून भावरूपाने उद्गमला संपवून क्रूर मानसिकतेला संपवले होते. आता पुढे!उद्गमला दोन्ही बाजूंनी पकडत त्याचे भारी शरीर कसेबसे दोघींनी उचलून धरले. काहीच पावलांच्या अंतरावर भावरूपाच्या डोळ्यांवर एक प्रकाश पडला आणि तिचे डोळे बंद झाले. डोळ्यांवर हात ठेवत समोर बघायचा प्रयत्न करणार तोच परत एक प्रकाश डोळ्यांवर पडला. दित्याचे लक्ष त्या दिशेने गेले आणि ती जोरात किंचाळली!"आमा पुलीस!"शब्द कानावर पडताच दोघींच्या हातून उद्गमचे शव सुटले आणि दोघी स्तब्ध राहिल्या.पोलिसांची तुकडी दित्याच्या योजनेनुसार घटना स्थळी आधीच पोहचली होती. पण, त्यांची योजना पूर्णपणे फसली! कारण, दित्याच्या योजनेनुसार उद्गम रंगे