मी समुद्र बोलतोय....

  • 41.6k
  • 24.3k

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होतामज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू स्वातंत्र्यवीर सावरकरांनी " सागरा प्राण तळमळला "अशी जेव्हा मला साद घातली होती , तेव्हा माझा ऊर अफाट अभिमानाने भरून आला ; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती . स्वर सम्राज्ञी लता दीदींच्या आवाजामुळे गाणं अगदी खूपच सुरेख झाल होत. मी समुद्र बोलतोय . आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना खंत व्यक्त करतोय . माझी व्यथाच जगजाहीर करीत आहे. पूर्वी पासून समुद्र किती अथांग आहे , किती शुभ्र निळाशार, किती तो असीम आहे