ॲ लि बी. - (प्रकरण १०)

  • 8.4k
  • 1
  • 4.5k

ॲलिबीप्रकरण १०टोपे चा सेक्रेटरी मंदार याने दारावर टकटक झाली म्हणून दार उघडले.दारात पाणिनी पटवर्धन ला बघून तो उडालाच ! “ अरे पटवर्धन तुम्ही? या आत या. काय विशेष काम काढलंत?”“ मी कोणाची नावे घेत नाही पण असं म्हंटल जातंय की शेअर चा व्यवहार ब्रोकर च्या ऑफिस मधून केल्यावर तू टोपे च्या केबिन मधे गेलास, तिथे त्याने तुझ्यावर आरोप केला की तुझा या व्यवहारात वैयक्तिक स्वार्थ होता, तुमचं त्यामुळे भांडण झालं आणि त्यात तू त्याचा खून केलास.”“ हे हास्यास्पद आहे.”“ म्हंटल तुला या गोष्टीची आधी कल्पना दयावी म्हणजे तू स्वतःची भूमिका स्पष्ट करू शकशील.”“ पाहिली गोष्ट म्हणजे मी ब्रोकर च्या ऑफिसातून