चुकीचे पाऊल! - १४ -(शेवट)

  • 8.7k
  • 2
  • 3.9k

आता पर्यंत आपण बघीतले.ईशाच्या सांगण्यानुसार त्यांच्या शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतंच लैंगिकता शिक्षणाचा समावेश असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे मनात एक विश्वासाची भावना निर्माण झाली होती. आता पुढे..!रात्री सगळे सोबत जेवण करून, झोपी गेलो. सकाळी ईशाच्या पप्पांना पॅरेंट्स मिटिंगची कल्पना देत, ऑफिससाठी तयार व्हायला मदत केली. नंतर ते ऑफिस साठी निघून गेल्यावर आम्ही दोघी तयार होऊन स्कूल बसची वाट बघत, बस स्टँड वर जाऊन थांबलो. परत एकदा मी शाळेचे दिवस अनुभवत होते. थोड्याच वेळात बस आली आणि सगळी मुलं एका रांगेत दारातून आत शिरली. मी, ईशा सोबतंच आत शिरले. माझं लक्ष न राहवून समोर ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने गेले आणि मी बघून आश्चर्याने