चुकीचे पाऊल! - १०

  • 7.7k
  • 4.5k

आता पर्यंत आपण बघीतले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुकडी सोबत प्रियांका गावडे यांचा अशासकीय गट माझ्या शाळेत पोहचला होता. तिथे ओंकार विषयी माहिती घेत त्याच्या शोधात शिपायांच्या गटाला तैनात करण्यात आले होते.आता पुढे..!पोलिसांची तुकडी शामल राहत असलेल्या ठिकाणी रवाना झाली. साधारण काहीच तासात आम्ही तिथे पोहचलो. बाहेरून खोलीचा दार कुलुपबंद नसल्याने शामल आत असल्याचे समजले. पोलिसांनी शिपायाला सांगून दार ठोठावले.आतून शामलने दार उघडले. समोर मला आई-बाबा आणि पोलिसां सोबत बघून तो घाबरला. पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच त्याला शिपायांनी पकडले! "हाच ना शामल?"अधिकाऱ्यांनी आई-बाबांवर नजर टाकत विचारले."हो, हाच!" दोघांनी होकारार्थी मान हलवली."कॉन्स्टेबल घ्या त्याला सोबत!" असं म्हणत शामलला सोबत पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश