चुकीचे पाऊल! - ०१

  • 15.7k
  • 9.8k

"तिचं ते मुलांकडे बघून आकर्षित होणं! आज चक्क ती सोसायटीमधल्या शुभमकडे बघून लाजली! देवा, मला लवकरच हिच्यासोबत याविषयी मोकळेपणाने बोलावं लागेल. नाहीतर! देव न करो!"विचार करता - करता मी भूतकाळात हरवले पण, लगेच घाबरून, भानावर आले."नाही, नाही…. छे!! असं व्हायच्या आतंच तिच्याशी यावर मी बोललं पाहिजे. हो, हेच योग्य. आजंच बोलायला हवं."बाल्कनीतून खाली रस्त्याकडे बघत उभी असता ट्युशन क्लासला जाते वेळी ईशा लाजून शुभमकडे बघताना मला दिसली. दोघांची नजरानजर कोणत्या उद्देशाने झाली असावी हे समजायला मला एक क्षणही लागला नाही! ईशाच्या शरीरात होणारे बदल बघून, आज माझ्या मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. शरीरात होणारे बदल आणि त्यांचे चांगले -