संत एकनाथ महाराज - १५

  • 5.7k
  • 2k

संत एकनाथ महाराज १५ श्रीकृष्ण उद्धव श्रीभगवानुवाच - गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत् । तन्मे पुरुषवर्येदमुपधारय शंसतः ॥१॥ ज्याचेनि चरणें पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती । ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महापापें ॥३९॥ ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चारितां निववी परम । तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥४०॥ सत्व रज तम तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न । पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका ॥४१॥ निःसंदेह सावधान । निर्विकल्प करुनि मन । ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण होइजे स्वयें ॥४२॥ माझे स्वरुपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था । माझे वचनीं विश्वासतां । पुरुषोत्तमता