ॲ लि बी. (प्रकरण ५)

  • 10k
  • 1
  • 6k

ॲलिबी प्रकरण ५प्रकरण ५दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन ऑफिसात आला तेव्हा सौम्या सोहोनी दारातच त्याची वाट बघत होती.“ माझ्या साठी काही विशेष वाढून ठेवलंय का पुढे?” पाणिनी ने तिचा अविर्भाव बघून संशयाने विचारले.“ मिसेस मिसेस टेंबे आणि गेयता बाब्रस.” –सौम्या.“ त्याच्या बरोबरची भेटीची वेळ दुपारी दोन ची होती ना पण ! “ –पाणिनी“ मला माहित्ये ते, पण त्या दोघी काहीतरी ठरवूनच आल्या आहेत. मनाशी. त्या म्हणताहेत की काही झालं तरी त्यांना भेटायचच आहे तुम्हाला., तुम्ही मला आज जेवायला नेणार होतात बाहेर त्यामुळे मी त्यांना कटवायचा प्रयत्न केला पण त्या हलायला तयार नाहीत, सारखी नखं कुरतुडत आणि पुटपुटत बसल्येत.”“ ती मुलगी कशी