आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात

  • 38.9k
  • 13k

Contents परिचय गुंतवणूक म्हणजे काय ? गुंतवणूक करणे का गरजेचे आहे ? गुंतवणूकीचे प्रकार विविध आर्थिक संकल्पना आर्थिक नियोजन विविध सरकारी गुंतवणूक योजना बँक अकाऊंटचे विविध प्रकार कर्जाचे विविध प्रकार विमा व त्याचे प्रकार फसव्या योजना इनकम टॅक्स कुटुंबातील आर्थिक पारदर्शकता परिचय आजच्या जगात आर्थिक साक्षरतेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. पैसा हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. यामुळे आर्थिक शिक्षण हे एक जीवन कौशल्य म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनासाठी दिले गेले पाहिजे हे खरे असले तरी, आपल्याला कोणी धनवान व्यक्ती त्याच्याकडील आर्थिक ज्ञान देईल असे कदापी होणार नाही. आपण स्वतःच आवश्यक असे आर्थिक ज्ञान मिळवले पाहिजे