सा य ना ई ड - (भाग ३)

  • 10.3k
  • 6.2k

सायनाईड प्रकरण ३दुसऱ्या दिवशी बरोबर साडेनऊ वाजता सौम्या सोहनी पाणिनी पटवर्धन ला म्हणाली, “ डॉ.डोंगरे आलेत इथे, त्यांना आपण दिलेल्या वेळे नुसार.”“ त्यांच्या बरोबर ती मुलगी आहे? “तिने मान डोलवली.“ कशी आहे ती दिसायला सौम्या ? “सौम्या जरा संकोचली.नंतर म्हणाली,’’ चांगली आहे दिसायला.”आणखी काय विशेष असं ? ““ लाजरी बुजरी ““ नकारात्मक व्यक्तिमत्व ? ““ नाही , नाही ,तसं अजिबात नाही.पण नेमकी कशी आहे माहित्ये का, घोटीव पाय आहेत, उभारीचे शरीर आहे पण त्याचे प्रदर्शन करणारी नाही.सुंदर डोळे आहेत पण नजर खाली आहे.,हात छानच आहेत पण घडी घालून बसली आहे.डोळे खूप बोलके आहेत पण हळुवार पणे संवाद साधणारे आहेत.तुमच्या लक्षात आले