श्री संत एकनाथ महाराज3 गुरूभक्ती

  • 10.4k
  • 4.4k

“श्री संत एकनाथ महाराज” “गुरू भक्ती” 3 ग्रंथाच्या शेवटी एकनाथ महाराज लिहितात. “ग्रंथारंभ प्रतिष्ठानी।तेथ पंचाध्यायी संपादूनी।उत्तर ग्रंथाची करणी।आनंदवनी विस्तारिली।।जे विश्वेश्वराचे क्रीडास्थान।जेथ स्वानंद क्रीडे आपण । यालागी ते नंदनवन ।ज्या लागी मरण अमर वांछिती ।। तया वाराणसी मुक्तीक्षेत्री। माणिकर्णिका महातीरी । पंचमुद्रापीठामाझारी ।एकदशावरी टिका केली ।। या प्रमाणे नाथांची भागवत टीका काशी क्षेत्रात गाजली.त्यावेळी काशीत तैलंगस्वामी नावाचे एक योगी पुरुष होते.ब्रिटिश राज्याच्या सुरवातीला हे स्वामी बालोन्मत्त पिशाचावत स्थितीत विवस्त्र हिंडत होते.ते पाहून त्यावेळच्या कोलेक्टरने मडमेच्या सूचनेवरून पोलिसाच्या कोठडीत बंदिवान करून ठेवले व नग्न फिरू नये असी ताकीद दिली.परंतु दुसऱ्या दिवशी हे स्वामी रस्त्यात नग्न फिरत असलेले पुन्हा दृष्टीस पडले.