पुस्तक परीक्षण समीक्षण - इन्शाअल्लाह

  • 11.5k
  • 1
  • 3.4k

पुस्तक परीक्षण / समीक्षणपुस्तक ~ इन्शाअल्लाहलेखक ~ अभिराम भडकमकर प्रकाशन ~ राजहंस प्रकाशन किंमत ~ ३५०/- लॉकडाऊन नंतर अक्षरधारा - राजहंस यांचा पुस्तकांचा सेल लागला होता. अभिराम भडकमकर यांचं नाव फक्त मराठी चित्रपटसृष्टीत आहेत म्हणून माहिती होतं. त्यांनी लिहिलेली कादंबरी पाहिली. कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ पाहून विकत घ्यावं की नको, म्हणून द्विधा मनस्थितीत होतो. ऐतिहासिक ग्रंथ आणि कादंबऱ्यांमध्ये रमणारा मी. अशा प्रकारची कादंबरी वाचण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न! गूढ, शोध, राजकीय,आणि ऐतिहासिक कादंबऱ्या माझा आवडीचा विषय. म्हटलं हे पुस्तक विकत घेतोय, पण न वाचताच पडून राहतेय की काय! वाचायला सुरुवात केली. मुस्लिम मोहल्ल्यातील वर्णनं, प्रसंग, वाचता वाचता कथा पुढे