ध्येयवेड्या मुलांची - भाग - 2

  • 11.7k
  • 4.5k

ज्ञानदा कॉलेज...सगळे आपापसात बोलत असतात एकच गोंधळ उडालेला असतो. तेवढ्यात आनंद देशमुख सर स्टेजवर येतात आणि सगळीकडे शांतता पसरते. देशमुख सर सूत्र संचालनाची जबाबदारी स्वीकारून बोलायला सुरुवात करतात.देशमुख सर(माईक समोर येऊन): "माननीय अतिथी आणि विद्यार्थीगण व इथे जमलेले सर्व पालकवृंद आज मला या सोहळ्याचे संचालन करण्याची संधी मिळत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो."देशमुख सरांच्या दमदार आवाजाने कार्यक्रमाची सुरुवात होते. आणि एका क्षणात सगळे शांत बसतात. मग दीप प्रज्वलन करून प्रिन्सिपल सरांना मनोगत व्यक्त करायला बोलावण्यात येत.काही मिनीटा नंतर...प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्याचा सोहळा सुरू होतो. एक एक विद्यार्थी मंचावर येऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपले पदवी प्रमाणपत्र स्वीकारत मनोगत