अनोखी प्रीत ही... - ३

  • 8.2k
  • 3.4k

भाग 2 पासून पुढे... दोन महिन्यानंतर....... तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विदयाबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंsघ्रियुगं स्मरामी ।। " चला वधूने नवर्‍या मुलाच्या गळ्यात हार घाला" भटजीकाका म्हणाले तसे भूविकाने अमिशच्या गळ्यात हार घातला...."आता वराने नवर्‍या मुलीच्या गळ्यात हार घाला "तसे अमीशनेही भूविकाच्या गळ्यात हार घातला.....लग्न संपन्न झाले असे कानी पडताच बाहेर ढोल ताशे वाजू लागले.... फायनली आज दोघे लग्न बंधनात अडकले.... "सुमती सदन"या भव्य मॅन्शनसमोर एक रॉयल ब्ल्यू सजवलेली मर्सिडीज येऊन थांबली. कारचा दरवाजा एका बाजूने उघडून त्यातून अमीश बाहेर आला व आत बसलेल्या भूविसमोर त्याने आपला एक हात पुढे केला..... भूविनेही आपला हात