बळी - २८

  • 12k
  • 5.9k

बळी- २८ रंजनाला आता केदारच्या भुताचा विसर पडला होता! आता तिच्या नजरेसमोर पोलीसांची वर्दी दिसत होती! मीराताईंचे शब्द तिला भेडसावत होते. त्या म्हणाल्या होत्या,"पोलीस माझ्याकडे चौकशीसाठी आले होते-- केदारविषयी खोदून खोदून विचारत होते -- तुझ्याविषयी विचारत होते-- बहुतेक ते तुझ्याकडेही येतील!" " जर पोलीस चौकशी चालू झाली; तर आपण काय करायचं? मला खूप भीती वाटतेय! ते असे काही उलटे सुलटे प्रश्न विचारतील, की माझं खोटं बोलणं लगेच