बळी - २७

(11)
  • 10.8k
  • 1
  • 5.3k

बळी - २७ रंजनाच्या मनावरील भीतीचा पगडा अजूनही कायम होता. आपण केलेल्या चुका तिला नजरेसमोर दिसत होत्या. दिनेशच्या नादाला लागून ही पापे तिने केली नसती; तर आज केदार मृत्यूनंतर तिच्यामागे लागला नसता, असं तिला वाटत होतं. तिच्या मनातील काही अनुत्तरित प्रश्न ती दिनेशला विचारू लागली. अजूनही तिचा आवाज थरथरत होता, " लग्नासाठी केदारने माझ्यावर जबरदस्ती केली नव्हती -- पैशाची किंवा इतर कोणतीही अपेक्षा त्याने लग्न ठरवताना