शापित पुस्तक.. भाग 1

  • 14.5k
  • 2
  • 5.1k

" ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। "उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥ # अंत माझा अंत कोणीही करु शकत नाही, मी अमर आहे, "माझ्या कानांवर हा एकच आवाज ऐकू येत होता,चेहरा गरम झाला होता, बाजूने कुठून तरी घंटा नाद ऐकू येऊ लागला, एका मध्यम वयाच्या पुरुषाचा आवाज कानावर येत होता,"तो माझी छाती जोर जोरात दाबत होता, माझ्या तोंडातून पाण्याची गुळणी बाहेर पडली..!!आणि जोऱ्याचा ठसका लागला, मी डोळे हळूच उघडले,सूर्याच्या पिवळसर प्रकाशाचे किरणे माझ्या चेहऱ्यावर पडले, होते,अंग ठणकत होते, अंगात त्राण नव्हता, कानावर पाण्याचा आवज येतं होता,मी उठून आजुबाजुला नजर फिरवली,