पाऊसः आंबट-गोड! - 1

  • 11.4k
  • 4.2k

(१) आषाढ महिन्याची सुरवात झाली होती. पहिल्याच दिवशी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु झाला होता. मस्त थंडगार, हवेहवेसे वातावरण होते. मी भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. चार वाजत होते.सेवानिवृत्त माणसाला दुपारच्या चारचे एक वेगळे आकर्षण असते ते म्हणजे चहा! कुणासाठी प्राणप्रिय, कुणासाठी अमृततुल्य तर बहुतांश लोकांना हवाहवासा असा! त्यातच जर वातावरण पावसाळी असेल तर मग हमखास चहा हवाच असतो. त्यामुळे जसजसा काटा चार या अंकाकडे सरकत होता तसतशी माझी तगमग, अस्वस्थता, चुळबूळ वाढत होती कारण अजूनही सौभाग्यवतीने स्वयंपाक घरात प्रवेश केला असल्याचे जाणवत नव्हते. कदाचित वातावरणाचा परिणाम असल्यामुळे त्यांचा शयनगृहातील मुक्काम काही मिनिटांसाठी वाढला असण्याची दाट शक्यता होती. ही शक्यताच मला बेचैन करत