लघुकथाए - 4 - गण्या, मनी आणि जांभूळ

  • 8.8k
  • 1
  • 3.3k

गण्या जागा झाला दचकून, घंटेच्या आवाजाने. क्षणभर कळेना त्याला, कुठे आहे ते! मग हळूहळू जाग आणि आठवण एकत्रच आली. काल संध्याकाळी पोलीस त्याला इथे सोडून गेले. ‘बा नं टांगलं सोत्ताला, आन् दोन दिसांनी आय पोलीस ठेसनात, मंदी आनी मला घिऊन ग्येली. आजाचा तिनं मुडदा पाडला शेतात, आसं म्हनली. समदं सांगितलं. पोरांना बगनारं कुनी न्हाय म्हनली. आयेला आता कुटं न्येलं काय म्हाईत. मंदीला पोरींच्या रिमांडात धाडनार हुते. मला हितं सोडलं. पन माजी मनी ऱ्हायली तितंच! आनि जांबळाचं झाड बी. त्येना कसं आननार ? बा, आजा, म्येले, आय पोलिस ठेसनात. मंदी आनि मी रिमांडात. घरला कोनीच न्हाय. मनी म्यॅंव म्यॅंव करत सोदत