३. दिलाच्या हाकेला दिलदारचा 'ओ' दिलाने दिलेल्या हाकेला 'ओ' देत दिलदारसिंगने पहिला निर्णय घेतला.. तो म्हणजे आधी गावच्या देवीचा आशीर्वाद घेणे.. मग गावोगावी फिरून कुठे 'कुछ कुछ होता है' का ते पाहणे. पोरं शाळा नि काॅलेजात जातात, तिथे या गोष्टींची 'सोय' आपोआप होते. पण दिलदार कधी शाळेचीही पायरी न चढलेला. त्यामुळे त्याला ही सोय नाही. त्याने कित्येक चित्रपटांतून हे ज्ञानाचे कण गोळा केलेले. शेजारील गावातल्या घंटाई देवीच्या पुढची घंटा त्याने वाजवली. डोळे मिटून हात जोडले. समशेरसिंग बरोबर होताच.. "सरदार, तुम्ही आपला घोडा गावाबाहेर सोडून चालत आलात? हाती बंदूक ही नाही .." "समशेर, अरे देवीच्या दर्शनास घोडा आणि बंदूक कशाला?" दिलदार