दिलदार कजरी - 2

  • 7.3k
  • 3.8k

२. दिलाची हाक आपल्या बापाने सोडलेला हुकूम ऐकून दिलदार खरेच गोंधळला. खरेतर घाबरला म्हणावे. आजवर शहरी संस्कृती त्याने पाहिली नव्हती. पण देशाची प्रगती झाली तशी गावागावातून वीज खेळू लागली. म्हणजे वीज प्रत्यक्षात ही खेळू लागली नि त्यानंतर लपंडाव ही खेळू लागली. पण सदैव भुकेल्यास खायला काहीही मिळाले तरी चालते. त्यामुळे विजेचे दिवे रात्री एक तास जरी मिणमिणता उजेड पाडत असले तरी गावे खुश होती. पाठोपाठ गावात टीव्ही पोहोचला. गावच्या चावडीवर सामायिक टीव्ही नि सामायिक कार्यक्रम दर्शनाचा कार्यक्रम होऊ लागला. गावातील वारे चंबळच्या खोऱ्यात न वाहते तरच नवल. चंबळच्या डाकूवर्गात ह्या उजेड पाडणाऱ्या दिव्यांची बात पसरली नि त्या पाठोपाठ हलती चित्रे