मित्रांचे अनाथाश्रम - भाग १५

  • 9.5k
  • 3.4k

विवेकने मला त्या दिवशी काय घडलं ते सांगायला सुरुवात केली. कार्यक्रम संपल्यावर तु घरी जाण्यासाठी निघाला आम्ही सर्व तुला सोडायला बाहेर आलो होतो. तुला सोडल्यानंतर आम्ही सर्व समीरला शोधत होतो. त्याला फोन केला तर तो ही बंद येत होता. आम्हाला वाटलं काही कामात असेल म्हणुन जास्त लक्ष दिलं नाही.आम्ही आधीच ठरवलं होत की आ म्या चा वाढदिवस साजरा करायचा. आम्ही सर्व केक मंडपात घेवून आलो आणि समीरला शोधणार तितक्यात आश्रमात मोठा बॉम्ब फुटण्यासारखा आवाज आला. सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले, स्वयंपाक घराच्या जवळ तो आग लागलेली दिसत होती. मी आणि संजय ने तिकडे धाव घेतली आणि दुसरा स्फोट झाला. एका