स्थित्यंतर - 2

  • 6.5k
  • 2k

2.'अजून देणे आयुष्याचे फिटले नाहीअजून माझे दुःख पुरेसे वटले नाही'"मी सुधा, रेवती ची सासू.भट साहेबांच्या या ओळी म्हणजे माझ्या आयुष्याचं प्रतिबिंब. मी एक स्त्री आहे हाच मोठा प्रश्न आणि हेच त्या प्रश्नामागचं उत्तर.पण मी उत्तर शोधत बसले नाही,माझ्या पिढीला ते मान्य नव्हतं. प्रस्थपितांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकलं,तेच अंगिकारले.स्त्री म्हणून ठिणगी-ठिणगी जळून गेलं मन आणि तन सुद्धा.एक समंजस सून झाले,घराची कारभारीन झाले.आदर्श वहिनी झाले,आज्ञाधारक बायको झाले.आई म्हणून कौतुक झालं. पणआज सासू नावाचं लेबल लागलं तर माझे अवगुण अधोरेखित करायला सगळे पुढे सरसावले. स्त्री म्हणजे ऊर्जा म्हणणाऱ्यांनो आज मी ऊर्जा नाही का??उभा जन्म चांगलं वाईट शिकण्यात गेला.रीती भाती चांगल्या असतात, त्याचं