अनेक वर्षे कारखाना चालवून वयोमानामुळे थकलेला मालक, आपल्या परदेशातून आलेल्या तरुण मुलावर कारखाना सोपवतो . नव्या उमेदीचा , उच्च शिक्षित मालक मिळाल्यामुळे नोकरदार मंडळी खुश होतात. आपल्याला कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळणार म्हणून मुलगा आनंदतो. मालकही हे चित्र पाहून, आराम मिळणार म्हणून ,समाधानाने , स्व खुशीने दुरच्या जागी मनः शांतीसाठी निघून जातो. win win situation आहे. वडिलांनी कारखान्याची घडी आधीच व्यवस्थित बसवली होती. अनुशासन आणि सुव्यवस्था नांदत होती . आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी आतुर असलेल्या मुलाला यात काही challenging /आव्हान वाटत नाही. कामगारदेखील रटाळपणाला कंटाळलेले आहेत . त्यांनाही बदल हवा आहे . परदेशात प्रयोग केले जातात त्या धर्तीवर, कामगार