When a boy loves truly..

  • 8.1k
  • 2.6k

मनातल आभाळ, भरून गेलेल, संध्याकाळ,...अंधारून आलेल अंगण, आणि मग पाऊस ... मुसळधार... लॅपटॉप वर विसावलेली नजर आणि सोबत वाढत चाललेला पाऊस ..खूप दिवसांनी काहीतरी लिहावस वाटलं..तूला मी आठवत असेन ..कदाचित नाही सुद्धा.. प्रिय .. हा एकच शब्द लिहून मनाच्या तळावर अनेक उसासे उतू गेले.. प्रिय .. खरतर प्रिय लिहावे कि नाही यात दोन रात्री गेल्या ...तरी रखरखत्या उन्हात, पावसाची सर बनून राहिलेल्या क्षणांच कर्ज असल्याने, लिहतो आहे. खूप दिवसांनी लिहतो आहे.तुझ्या नंतर हा पाऊसही दरवेळच्या जुन्या होत चाललेल्या जखमांचा पसारा मनावर कोरून जातो हल्ली तुझ्यासारखा रिमझिम बरसत नाही मुसळधार होत जातो क्षणाक्षणाला आणि अचानक मग रागावून निघून जातो पाऊस हा