तमाशा

  • 21.2k
  • 1
  • 7k

तमाशा रविवार असल्याने आज गावचा बाजार होता. बबन बोरगांवकराच्या तमाशा मंडळाची गाडी सकाळपासूनच बाजारातून अनांउंसींग करत फिरत होती. तमाशा मंडळाच्या गाडीवर दोन-चार लावण्यवतींचे पोस्टर लावलेले होते. पोस्टरवरील पोरी अतिशय देखण्या दिसत होत्या. तमाशा आल्यामुळे आजूबाजूच्या खेडयातले लोकही तमाशाला थांबले होते. बऱ्याच जणांनी तमाशा पाहण्यासाठी बाजाराला आणलेले पैसे पूर्ण न उडवता, बचत केले होते. तमाशा आल्यानं सगळेजण आनंदात होते. दिवस मावळतीला आला, तसं सगळेजण लगबगीने दुकानं आवरु लागले. सगळयांना तमाशाची ओढ लागली होती. गबरु आणी पम्या दोघेही पम्याच्या रानातच झोपायला जात होते. त्यामुळे गबरुनी जेवण केलं आणी आईला रानात झोपायला चाललोय म्हणून सांगीतलं. पम्या चावडीवर गबरुची वाटच पाहत उभा होता.