“ लिहिताना मी एक हातबॉम्ब तयार करीत आहे याची मला कल्पना ही नव्हती” – विभावरी शिरूरकर (प्रस्तावना -कळ्यांचे निःश्वास) स्त्रियांचे हक्क आणि त्यांची हतबलता यांचे वास्तव चित्रण करताना त्यांनी हे वाक्य लिहिलं होतं ,वर्ष साधारण 1933 असावं. आज शतकोत्तर मी हेच वाक्य केवळ स्त्रियांसाठी नव्हे पण संपूर्ण मानव प्रजातीविषयी मत मांडताना लिहीत आहे. जो पीडित,उपेक्षित आहे असे कुणीही.समानतेचा मानवतावाद विस्तारणारा आत्मोन्नतीसाठीचा हा संदेश असेल.एका विशिष्ट समूहाला केवळ जन्माधारे कृतक सहानुभूती दाखवून ,वाहवा किंवा वादंग माजविण्याचा आणि त्यातून फुटकळ लाईक्स आणि स्टिकर्स कलेक्ट करण्याचा मला छंद नाही. अत्यंत तटस्थ राहुन कोणत्याही व्यक्ती व प्रजातीचा पक्षपात न करता, केवळ नीतीची