प्रवास

  • 6.7k
  • 1
  • 2.6k

प्रवास बिपीन बऱ्याच वेळापासून पुण्याला जाण्यासाठी बीडच्या बसस्थानकामध्ये उभा होता. उद्या त्याचा पुण्याला स्पर्धा परीक्षेचा पेपर होता. त्याला आजच इंजिनिअरिंगला जावून सात वर्ष झाली तरी अजून इंजिनिअरिंगच करत असलेल्या आपल्या बारावीच्या मित्राच्या म्हणजेच सचिनच्या रुमवर मुक्कामासाठी जायचं होतं. पेपर उद्या असला तरी बिपीनचा काहीच अभ्यास झालेला नव्हता. मुद्दाम फिरण्यासाठीच त्याने पुण्याला फॉर्म भरला होता. तरीही बिपीनने बस स्थानकामधून सहजच प्रवासात वाचण्यासाठी चालु घडामोडीचं पुस्तक विकत घेतलं होतं. आज बसस्थानकामध्ये खुपच हिरवळ होती. गाडी येईपर्यंत तो त्या हिरवळतील सुंदर फुलांकडे पाहु लागला.एखाद्या मुलीनं प्रतिसाद दिला की, त्याच्या मनात असंख्य प्रेमलहरी उठत होत्या. थोडयाच वेळात पुणे गाडी आली. लोकांनी एकच