सावर रे.... - 4

  • 8.9k
  • 4.2k

तिने वळून पाहिले तर ती गाडी सरळ तिच्या दिशेने येत होती. अजून जवळ जवळ आता अगदी तिला धडक बसेल इतकी जवळ आणि आपल्या डोळ्यावर हात घेऊन ती जोरात किंचाळली…..."आ…...ई….." ती गाडी अगदी तिच्या जवळ येऊन थांबली. तिची ती अवस्था पाहून तो जोरात ओरडला… "जाई…" त्याचा आवाज ऐकून तिने डोळ्यावरचा हात बाजूला कडून समोर पाहिलं तर यश धावत तिच्या जवळ आला होता. तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले तिच्या तोंडून फक्त ......"यश " इतकेच बाहेर पडले. त्याला पाहून तिचा हुंदका वाढला होता. तो तिच्या जवळ आला, त्याला तिची अवस्था पाहून तिची खूप काळजी आणि काहीशी भीती पण वाटत होती. त्याला