समोर दिसलेला मृत्यू

  • 6.8k
  • 2
  • 2.4k

माझी आई युगांडाला आमच्याबरोबर थोड्या दिवसांसाठी राहायला आली होती. त्यावेळी तिला वेगवेगळी ठिकाणे दाखवण्यासाठी खूप फिरलो. खूप साऱ्या ट्रिप्स अविस्मरणीय होत्या पण त्यातली एक ट्रिप कायम लक्षात राहिली ती म्हणजे - Queen एलीझाबेथ नॅशनल पार्क... आम्ही 3 कुटुंब मिळून जंगल सफारीला जाणार होतो. एकत्र मज्जा येईल म्हणून बसच बुक केली होती. साधारण 6 तासाचा प्रवास असल्यामुळे पहाटे 5 वाजताच घरून निघालो. खूप मज्जा केली जाताना. दमशराज, नावाच्या , गावाच्या, गाण्याच्या भेंड्या असे खूप सारे खेळ खेळलो आणि बसमध्ये खायला म्हणून प्रत्येकाने भरपूर नाश्ता करून घेतला होता. त्यामुळे 6 तास कसे गेले ते समजलेच नाही. हॉटेलमध्ये थोडा आराम करून दुपारच्या जंगल