पहिला विमान प्रवास

  • 7.6k
  • 3
  • 2.3k

आनंदना घाना मध्ये जॉब ऑफर आली तेव्हा आम्ही ती स्वीकारावी की नाही ह्याच विचारात होतो. पण नंतर विचारविनीमय करून असे ठरवले की हे दोन वर्षासाठी एकटेच जातील आणि मी दोन मुलींना घेऊन इथेच राहीन म्हणजे मग मला जॉबपण सोडायला लागला नसता. पण आपण जे ठरवतो तसेच नेहमी घडते असे होत नाही. कॉन्ट्रॅक्ट साइन करताना तुमच्या बायकोला पण घेऊन या म्हणून डायरेक्टरने आम्हाला कळवले. माझ्याशी काय बोलायचे असेल हे न कळून आम्ही तसेच संभ्रमाअवस्थेत ऑफिसमध्ये पोहचलो. डायरेक्टर साहेबांचे वय साधारण ६०-६५ च्या दरम्यान असेल. गृहस्थ खूप चांगले वाटले. आम्ही गेल्यावर त्यांनी माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या, माझी सगळी माहिती