हनिमून

(15)
  • 30.5k
  • 3
  • 7.8k

लग्न झाल्यावर एक रीत/पद्धत असल्याने आम्हीपण हनिमून साठी दिल्ली, कुलू, मनाली, सिमला ह्याठिकाणी गेलो होतो. पुण्याहून मुंबई व तिथून राजधानी एक्सप्रेसने दिल्ली आणि तिथूनपुढे आम्ही सगळीकडे कारने फिरलो. तसे आम्ही आजपर्यंत ट्रेनने भरपूर प्रवास केला पण मी राजधानी एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदाच बसले होते. राजधानी एक्सप्रेस खूपच छान होती. ऐसपैस, एकदम स्वच्छ! आम्ही आमच्या सीटवर बसल्यावर लगेच पाणी आणून दिले, नंतर खायलापण आणून दिले. ह्यांनी मार्केटिंग मध्ये असल्यामुळे खूपदा अश्या ट्रेनने प्रवास केला होता पण मी हे सगळे पहिल्यांदाच अनुभवत होते! एकदम भारी वाटले. दिल्ली कधी आले कळलेपण नाही! दिल्लीला स्टेशनवर उतरल्यावर आमच्या नावाचे फलक घेऊन आमच्या कारचा