भुताचा वाडा

  • 18k
  • 1
  • 5.4k

भुताचा वाडा परीक्षा संपून मी खुप दिवसांनी गावाकडे आलो होतो. त्या काळी मोबाईल सर्वांकडेच नसायचा. गावातील एखाद्याकडेच असायचा. त्यामुळे सर्वजण एकत्र जमून पारावर गप्पांची चांगली मैफल रंगायची. असेच रात्री नऊ वाजता आम्ही मित्र मारुतीच्या पारावर गप्पा मारत बसलो होतो. लाईट गेली होती, सगळीकडे अंधार होता. बोलता-बोलता गण्यानं जगन सावकाराचा विषय काढला. गावाच्या पूर्व बाजूला जगन सावकाराचा टोलेजंग, चिरेबंदी वाडा होता. त्या भल्यामोठया वाडयामध्ये तो एकटाच राहत होता. गावातील जवळ-जवळ सगळयांकडेच त्याचे पैसे होते. गावातले लोक त्याला गुलामासारखे वाटत होते. तो वसुलीच्या नावाखाली सर्वांना त्रास द्यायचा. पण एके रात्री दरोडेखोरांनी त्याला वाडयातच मारुन टाकले व त्याचा मृतदेह वाडयातीलच आडात फेकून