राजकुमार ध्रुवल - भाग १

  • 25.2k
  • 9.4k

राजा सूर्यभान दयाळू व न्यायप्रिय राजा होता.राजाची राणी चंद्रप्रभा ही सदगुणी होती...राजा ला एक पुत्र होता आर्यविर..आर्याविर ही वडीलांसारखाच ..दयाळू व न्याय प्रिय होता..सर्व गुणान मध्ये निपुण होता.. आर्य विर आता मोठा झाला होता.. राजाचा सेनापती.. रंदन..त्याची एक कन्या होती.. वशिका.. वशिका ..दिसायला सुंदर होती पणं तिला गरिबांची चीड येत असे..ती त्यांना तुच्छ लेखत असे..तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता.. आर्य वीर सोबत लग्न करण्याची व राणी होण्याचं स्वप्नं होत तिचं..आणि सेनापतींची ची ईच्छा होती की वशिका राणी बनावी..सेनापती व वशीका राजा समोर खूपच चांगले वागत असत त्यामुळे राजा सूर्यभान ला वशिका आपल्या आर्य वीर साठी योग्य आहे असे वाटू लागले