प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०५.

  • 9k
  • 3.8k

संजय काही वेळ काउच वर पडून असतो..... डोळ्यात त्याच्या पाणी असतं.... आणि डोक्यात नको ते विचार.....???? आजी आणि जया, बिल पे करुन, साड्या घेऊन येत असतात...... त्या दोघी बोलत - बोलत येताना, त्यांच्याकडे संजयच लक्षच नसतं..... तो सुकन्याच्याच विचारात हरवून, फक्त रडत असतो....??? आजी : "संजू बाळा काय झालं..... आणि माझी पिल्लू....?? कुठेय ती.....???" संजय : "...... आ...... आई..... त...... ती.....?????????" तो ढसाढसा रडायला लागतो...... त्याला बघून आजी आणि जायला काहीच समजत नाही...... एकतर पिल्लुही कुठेच त्यांना दिसत नाही...... त्या संजयला खूप वेळ तसेच विचारत असतात...... आजी : "सांग ना संजू कुठेय पिल्लू....??" जया : "अहो...??? कुठेय.... म..... माझी पिल्लू....??"