शिकार

  • 11.5k
  • 1
  • 4.6k

आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बाजीरावाचे घरात खुपच लाड झाले होते. तो पंचवीस वर्षाचा झाला तरी त्याचे आई-वडील त्याला लहान मुला सारखचं सांभाळत होते. गावातील सगळया वाडयांमध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा, पस्तीस एकर बागायती जमीन, तालुक्याला प्लॅाटींगमध्ये गेलेली जमीन, पंचवीस-तीस दुभती जनावरं, दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी, चार-ट्रक एवढया प्रॉपर्टीचा तो एकुलता एक वारसदार होता. फक्त तब्येत बनवायची,खायचं-प्यायचं अन् पोरींच्यामागे फिरायचं, एवढच काम तो करायचा. ‘आबा’, म्हणजे बाजीरावाचे वडील, त्यांचं वय साठीकडं झुकलं तरी त्यांचं शरीर बलदंड होतं. घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते. बाजीरावही आता भर तारुण्यात होता. निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याला