शोध आणि धागेदोरे - (रिसर्च अँड रेफ्रेन्सस)

  • 18.7k
  • 12.3k

प्रस्तावना शेवटी एकदाची ही कथा हातावेगळी करत तुमच्यापर्यंत पोचवताना अत्यंत आंनद होतोय, आशा आहे की तुम्हाच्या अपेक्षांना पात्र ठरेल. तुमचाच लेखनवाला. lekhanwala@gmail.com http://lekanwala.home.blog https://www.facebook.com/LekhanwalaPage/ ******* रेल्वेस्टेशनच्या आवारात तुरळक माणसं, शांत पुहडल्यासारखे दिसणारे रेल्वेचे फलाट. सकाळी अकराची वेळ दाखवणारं रेल्वेकडच्या भिंतीला वरच्या टोकाला टागलेलं ते थोराडं दिसणारं एकमेव घड्याळ, फलाट क्रमांक एकवर ट्रेनची वाट बघणारा 'तो' स्वतः आणि समोरच्या फलाट क्रमांक दोनवर..... तिथे कोणीच प्रवासी गाडीची वाट बघत नव्हता.... फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, त्यांच्या बाजूलाच रंगीबेरंगी पिसाच्या खुळखुळ्यासोबत नुसतंच खेळत असलेलं त्याचं ते निरागस एक-दीड वर्षोंच