शीघ्र कवीचं टेंगुळ जेव्हा फुटतं..?

  • 4.9k
  • 1.6k

मी गोविंद एक शीघ्र कवी.... हे बिरूद मीच धारण केलंय जेव्हापासून मी कविता लिहायला लागलो..... आज मी नवीन कवितेच्या शोधात आहे पण, कोणास ठाऊक आज मनात विचित्र भाव आहेत.... वाटतं आज काहीतरी साक्षात्कार होऊ शकतो..... चला बघूया!.... माझ्या घरापासून साधारण पंधरा ते वीस मिनिटांवर बसस्टॉप असल्याने पाई एकटं जाणं मी पसंत करतो.... त्याचं कारणही मजेदार आहे..... मला स्वतःचा सहवास आवडतो.... कस असतं ना, आपण स्वतःला कितीही शिव्या घाला, आपल्याला स्वतःचा कधीच राग येत नाही... पण, दुसऱ्या कोणाला जर आपण विचार न करता "तू" जरी बोललो ना तरीही त्यांच्या दाबून ठेवलेल्या भावना उफाळून येतात..... म्हणून, एकटा जीव सदाशिव असणं.... कधीही बरं,