मिले सूर मेरा तुम्हारा - 3

  • 9.8k
  • 3.9k

असेच दिवस जात होते आणि एक दिवस निनाद लवकर घरी आला. आला तसा फक्त तो फ्रेश झाला असेल नसेल तसाच cot वर झोपला. आधी वृंदाला वाटलं की तो थकला असेल. मग तिनेही त्याला आवाज दिला नाही. ती स्वयंपाकाला लागली. तिने अगदी साधं जेवण बनवलं होतं. वरण-भात , चपाती आणि मेथीची भाजी. जेवण तयार झालं तशी तिने पानं वाढली आणि निनादला आवाज दिला. पण तो जागचा हलला नाही. तिने पुन्हा आवाज दिला. “निनादऽऽ..” पण काहिच प्रतिक्रीया नाही. शेवटी तिने त्याच्या हाताला हात लावून त्याला उठवायचा प्रयत्न केला. आणि वृंदाला निनादचा हात गरम लागला. तिने लगेच त्याच्या कपाळावर हात ठेवला. निनाद तापाने