गूढ..

  • 8.6k
  • 3k

मालती साधारण पंचविशीत असेल..... दिसायला गोरीपान, उंच, अंगकाठी अगदीच आकर्षक..... पण, कोण जाणे? तिला अजुन लग्नासाठी कोणीच पूर्णपणे होकार दिला नव्हता.... पाहुणे यायचे, बघून जायचे आणि नंतर कळायचं की, जाता - जाता त्यांच्या गाडीचं एक्सेडेंट झालं..... असेच तीन - चार स्थळ सांगून आले असतील..... नंतर मात्र तिच्या घरच्यांनी लग्नाचा विषय थोडा लांबणीवर टाकून तिला घरीच ठेवले.... लोकं टोमणे मारायची पण, त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही अस तिच्या घरी सांगण्यात आलं होतं..... मालती सगळी कामं आटोपून घरी राहायची आणि नेहमी खिडकीतून बाहेर बघत बसायची...... तिला वाटायचं की, कधी त्या पिंजराबंद घरातून ती बाहेर स्वतंत्र घुमेल...... त्याच सोसायटीमध्ये राम नावाचा एक वॉच