मृदुला - 1

  • 7.7k
  • 2
  • 3.2k

मृदुला हि एका गावातील परिस्थितिने गरीब असलेल्या घरातील मुलगी . घरामध्ये आई - बाबा, मृदुला आणि तिचा लहान भाव उत्कर्ष असे राहत होते . मृदुला लहानपणापासूनच हुशार, थोडी घाबरट , जगाची पारख नसलेेली पण समजूतदार , नेहमीच समोरच्याला समजून घेणारी आणि येईल त्या परिस्थितिमध्ये सांभालून घेणारी मुलगी होती . आज मृदुलाचा दहावी चा निकाल होता . ती आणि घरातील सर्वच खूप उत्साहित होते . मृदुला सकाळीच लवकर उठून आईबाबांच्या पाया पडून निकाल आणण्यासाठी गेली होती . इकडे आई बाबा आधीच स्वागताच्या तयारीत होते . तितक्यात मृदुला धावत ओरडत आली , आई - बाबा मी पहिल्या नंबरने पास झाले