सावर रे.... - 2

  • 8k
  • 4.4k

मागील भागात, माईंच्या काळजात चर्रर्र झाले त्या काही बोलणार तर नितीन आणि सारिका लगेच बाजूला झाले. माईंनी भरल्या डोळ्यांनी समोर पाहिले तर त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला "यश…." "यश...."म्हणत माईंनी त्याला दारातच मिठी मारली आणि त्यांचे डोळे आपोआप आपल्या मुलाच्या येण्याने आनंदून बेधुंद वाहू लागले. यश ची अवस्था पण काहीशी तशीच होती. खूप मिस केलं होतं त्याने त्याच्या आईला. त्याचे ही डोळे पाणावले होते. मुलं कितीही मोठी झाली तरीही त्याना आईच्या कुशीत जे समाधान मिळतं ते कदाचित स्वर्गात पण नसावं. त्याने आईला मिठीत घेऊनच विचारले... "कशी आहेस तू आई?" माई… "मी बरी आहे रे आता तू आलास ना