त्याग – प्रेमकथा (भाग १) सायंकाळचे सहा वाजत आले होते. सूर्य मावळतीला झुकला होता आणि हवेत गारवा जाणवत होता. विनयने दारावरची बेल वाजवली. काही क्षणातच आईने दरवाजा उघडला आणि हसत विचारले – "अरे तू आहेस तर! आज लवकर आलास?" विनय बूट काढत म्हणाला, "हो, ऑफिसमध्ये जास्त काम नव्हतं, म्हणून लवकर आलो." आईचा चेहरा आनंदाने उजळला होता. ती थोडीशी गडबडलेली वाटत होती. त्याने आश्चर्याने विचारलं – "आई, काही खास झालंय का? इतकी खुश का आहेस?" आईने हसत सांगितलं, "अरे, माझी जुनी मैत्रीण रत्ना येणार आहे भेटायला! खूप