बॅलन्सशीट

(1.5k)
  • 10.7k
  • 1
  • 3.2k

सातचा गजर वाजला. राजारामने किलकिल्या डोळ्यांनी मोबाईल बघून बंद केला व तो पुन्हा अंथरूणावर आडवा झाला. त्याची पत्नी माधुरी पहाटे साडे चार वाजता उठून, पाणी भरून थोड्या वेळापूर्वीच झोपली होती. गजरच्या आवाजाने तीही जागी झाली. पण उठण्याची घाई नसल्याने तीही तशीच पडून राहिली. पाच-सात मिनिटांत मोबाईल पुन्हा वाजू लागला. राजारामने नाखुशीने फोन उचलला. फोनवर झळकलेले नाव बघून तो ताडकन उठून बसला.“ हॅलो ! “ करडा आवाज राजारामच्या कानावर पडला. “ हॅलो, गुड मॉर्निग सर. “ राजाराम दबक्या आवाजात म्हणाला.“ गुड मॉर्निग. बॅलन्सशीट झाली असेल तर लगेच मला पाठव. मला जरा परत एकदा तपासून बघू दे. “ “ सॉरी