Marriage Anniversary

  • 10.5k
  • 3k

हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?”ती लगेच म्हणाली, ” काहीही नको मला, सर्व काही आहे माझ्याकडे.” (पण तिचे स्वगत,” अनेक वर्षे झालीत लग्नाला. तरीही सांगावे लागते काय गिफ्ट हवे ते. मनकवडा नाही तर नाही पण जाणकवडा तरी व्हायला हवे ना एवढ्या वर्षांत!! )” मला हेच पटत नाही तुझे. कधी काही म्हणून काही मागायला नको.” नवरा मनकवडा नव्हताच. त्यामुळे स्वगत कळण्याचा प्रश्नच नव्हता.” तुम्ही तरी काय मागितले आजवर माझ्याकडे, तरी मला जमेल तसे काहीबाई गिफ्ट देतच होते मी!” तिने टोमणा मारला.” तुला तर माहिती आहे, मला यातले काही कळत नाही.