बिग बॉस - अनटोल्डमिस्ट्री (भाग 1)

  • 9.1k
  • 3.5k

पाच वर्षांपूर्वी...दशपुत्रेंच्या घरात...वेळ संध्याकाळी 6 वाजताची..आस्था "मुगू (मुग्धा), झालं का बेटा आवरून बर्थडे गर्लच बर्थडेत उशिरा पोहोचली तर कस होणार चल आवर पटकन (मनाशीच) हा आतिश देखील कुठे राहिला देव जाणे लवकर येतो म्हणून सांगून गेलाय अजून पत्ता नाही याचा."मुग्धाचा 12वा वाढदिवस म्हणून आज दशपुत्रेंच्या घरात नुसती लगबग सुरू होती त्यातून आतिशचा ही पत्ता लागत न्हवता म्हणून आस्था आणखीनच काळजीत होती. खर तर आस्थाच आतिशच उशिरा येणं हे काळजी मागचं मेन कारण न्हवतच तर तिच्या काळजी मेन कारण होत सारख्या आतिशला मिळणाऱ्या धमक्या.मागच्या काही दिवसांपासून आतिशला वारंवार धमक्या मिळत होत्या. त्यामुळे आतिशच्या घरातले सर्वचजण अस्वस्थ होते. तरीही घरातल्या सगळ्यात लहानगीचा