२९ जून २०६१ - काळरात्र - 12

  • 8.2k
  • 3.2k

तिने घाबरून शौनकची मिठी सोडली आणि त्याच्याकडे एकदम भेदरलेल्या नजरेने बघू लागली. त्याच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव तसेच होते. हंसीका केव्हाचं काय बडबडतेय असं त्याला वाटत होतं. हंसीका घाबरत उच्चारली, “तू... तुझ्याकडे असलेली ग्लोस्टिक दाखव.” त्याने खिशातून त्याची हिरव्या रंगाची ग्लोस्टिक काढली आणि हंसीका समोर धरली. ती ग्लोस्टिक बघून हंसीका खूप घाबरली. तिचे पाय लटलटू लागले. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिला कळून चुकलं की ती जेव्हा गाडीकडे आली तेव्हा ज्या काळोखातून म्हणजे डार्क झोन मधून आली होती, तो समांतर विश्वात जाण्याचा रस्ता होता आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यातलं कुणीही म्हणत होतं की ते एका काळोखातून गेले तोच हा समांतर विश्वात